श्री विठ्ठल रखुमाई पतसंस्थेच्या दोन कर्जदारांना अटक

0

भुसावळ  –
येथील श्री विठ्ठल रखुमाई पतसंस्थेच्या दोन कर्जदारांच्या आज दि.24 ऑगस्ट रोजी जळगाव
येथील आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाने यावल व पाडळसा येथून मुसक्या आवळल्या आहे.
यावल येथील अशोक महाजन यांनी तीन प्रकरणे करुन कर्ज घेतले होते मात्र ते पतसंस्थेची थकबाकी भरत नव्हते तर दादा निवृत्ती तायडे हे सुद्धा कर्जाची परतफेड करीत नव्हते. त्यांच्यासह अनेक कर्जदारांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे दाखल आहेत. आज दि.24 रोजी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे,अप्पर अधिक्षक लोहीत मतानी,प्रभारी निरीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थीक गुन्हे शाखेचे सपोन विजय देशमुख,एएसआय रमेश सुर्यवंशी,पोहेकॉ प्रविण जगताप,अधिकार पाटील, पो.ना.जीवन पाटील व दिलीप चव्हाण यांच्या पथकाने सकाळी 7 वाजेनंतर दोघांना अटक करुन
दुपारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्या. श्रीमती शिंदे ह्यांनी दोघांना 6 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले.
यापूर्वी नागराणी बंधू,नेहते, यांना तुरुंगात रहावे लागले होते. तर ब्रिजलाल बठेजा, वासुदेव बठेजा हे सद्ध्या कोठडीत आहेत. कर्जदार प्रदिप जनार्दन धांडे, माणिक जनार्दन धांडे, व विवेक मनोहर किरंगे रा. भुसावळ हे कर्जदार सुद्धा उच्च न्यायालयापर्यंत जामीन रद्द झाल्याने शहरातून भुमीगत झाले आहे.आज न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नवाब अहमद , पतसंस्थेतर्फे अ‍ॅड. सौ. वैष्णव यांनी तर ठेवीदारां तर्फे अ‍ॅड. पिंजारी यांनी काम पाहिले

Leave A Reply

Your email address will not be published.