श्री मनोज पाटील इंग्लीश स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

0
जळगांव(प्रतिनीधी)- येथील आव्हाने शिवारातील श्री मनोज पाटील इंटरनँशनल इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, शाळेत वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धा जसे की, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, मैदानी स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थांचा आज बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
 यावेळी या कार्यक्रमात जे पालक आपल्या पाल्याला खूप परीश्रमातुन  घडवत असतात तसेच आपल्या पाल्यांबाबतीत सदैव सजग असतात अशा पालकांचा देखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका कु .प्रतीक्षा मनोज पाटील, नगरसेवक उत्तम शिंदे, पल्लवी सोनार, सुनंदा लोखंडे शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील हे उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संगीता देशमुख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशा पाटील यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले यांना शाळेतील दिपाली परदेशी, प्रज्ञा बावीस्कर, सुनंदा पाटील, राजश्री चौधरी यांनी सहकार्य केले.
Leave A Reply

Your email address will not be published.