श्री बालाजी संस्थानच्या अन्नदान समितीवर अध्यक्ष म्माहणून जी खा.ए.टी (नाना) पाटील

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील श्री बालाजी संस्थान अंतर्गत अन्नदान समितीचे अध्यक्ष रामदास तुकाराम वाणी यांचे निधन झाल्याने सदर जागा रिक्त झाली होती.या महत्वपूर्ण समितीच्या अध्यक्षस्थानी माजी खा.अे. टी.( नाना)पाटील यांची ता,२७ रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी नुतन अध्यक्ष श्री पाटील यांचा सत्कार श्री बालाजी संस्थानचे मुख्ख विश्वस्त श्रीकांत शिंपी सह विश्वस्तांनी केला.

१९९५ पासुन श्री भक्तांकडुन २५०१ रु देणगी घेवुन गेल्या २५ वर्षापासुन नवरात्र उत्सव काळात महाप्रसाद दिला जात आहे. तत्कालिन अध्यक्ष(स्व) रामदास वाणी यांनी अन्नदान समिती सदस्यांबरोबर लोकसहकार्यातुन अखंडीतपणे अन्नदानाची सेवा दिली.मात्र त्यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.या रिक्त जागेवर अध्यक्ष निवडुन हे सेवा कार्य असेच सुरु रहावे यासाठी श्री बालाजी संस्थान च्या ट्रस्टी व अन्नदान समिती यांनी सर्वोनुमते ही जबाबदारी माजी खा.अे.टी (नाना)पाटील यांच्यावर सोपवली.

वर्षभर अन्नदान करण्याचा मानस 

गेल्या २५ ते २६ वर्षापासुन श्री बालाजी संस्थान कडुन विविध उपक्रम राबविले जातात.लोकसहभागातुन  शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य अशी विविध उपक्रम राबविणेकामी सर्वाचे सहकार्य घेत श्री बालाजी संस्थान विश्वस्त व अन्नदान समिती हे वर्षभर संस्थानच्या माध्यमातुन महाप्रसाद देवुन सेवाकार्य वाढविणार असल्याचा मानस समिती अध्यक्ष माजी खा.अे.टी ( नाना) पाटील यांचेसह सदस्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी मुख्ख विश्वस्त श्रीकांत शिंपी,डाँ अनिल गुजराथी,प्रकाश शिंपी,दिलिप शिरुडकर,पुजारी संजय पाठक,प्रमोद शिरोळे,रमेश भगवती,केशव क्षत्रिय,दिनेश गुजराथी,संजय कासार,अरुण वाणी,अमोल वाणी,पत्रकार संजय पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.