धरणगाव :- येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळच्यावतीने मंदीर जीर्णध्दाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री राम नवमीचे औचित्य साधुन संस्थेच्यावतीने संध्याकाळी 5 वाजता अमळनेर येथील श्री क्षेत्र सखाराम महाराज संस्थेचे विद्यमान गादीपती प.पु. प्रसाद महाराज,नारायण भक्तीपंथाचे मुख्यप्रर्वतक प.पु. लोकेशनन महाराज, रामेश्वर संस्थेचे महंत नारायण स्वामी, वारकरी शिक्षण संस्थेचे महंत ह.भ.प.भगवान महाराज, व पुरवणीक बंधु चा हस्ते विधीव्रत पुजन करून मंदीर जीर्णध्दाराचे भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सर्व महंतानी आपल्या मधुर संगीत स्वरात भगवंताचे नामस्मरण करून भक्तीमय वातावरण निर्माण झाले. मंदीर उभारण्यासाठी दानशुर व्यक्तीनी पुढे येऊन ह्या सनातन हिंदु धर्माचा कार्यात योगदान देऊन सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष प्रा डी आर पाटील सर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम ची रूपरेषा मांडून येत्या दोन वर्षात मंदीर पुर्णपणे उभे राहील, असा विश्वास व्यक्त करून देणगीदार दात्याचे व कालिदास पुराणिक, लिलाधर पुराणिक, रमाकांत पुराणिक व प्रभाकर पुराणिक ह्यांनी मंदीर जीर्णध्दाराचा उभारणीत सहकार्य केल्या बद्दल धन्यवाद देऊन आभार मानले, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी आलेल्या संत महंत व देणगीदार दात्याचे आभार मानले प्रारंभी उपस्थित संताचे बालकवी व सा.दा. =कुडे विद्यालयाच्या ढोलपथक व झांजपथकाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर सचिव राजेद्र पवार, सह सचिव प्रशांत वाणी, अशोक येवले, आदि उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीते साठी प्रसंगी संस्थेचे सर्व सभासद व असंख्य महीला उपस्थित होते.