पाचोरा :- पाचोरा तालुका शिक्षण प्रसारक संस्था पाचोरा संचलित श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा येथे दिनांक २१ शुक्रवार रोजी सकाळी साडेसात वाजता विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योग शिक्षणाचे धडे घेतले. योगशिक्षक डी. डी. कुमावत यांनी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बैठे ५, उभे राहून ५, पोटावर व पाठीवर झोपून करावयाचे ५, असे एकूण १५ योगासनांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतलेत. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी, जे. एम. महाजन, समाधान पाटील, त्याच बरोबर पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील, उपस्थित होते.
यावेळी सभापती व गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थी व शिक्षकांना योगासना विषयी माहिती दिली.योगासने आपल्याला शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी किती आवश्यक आहेत. हेही पटवून दिले. शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. एल. वाघ, पर्यवेक्षिका सौ. पी. पी. पाटील, सौ. प्रमिला वाघ सांस्कृतिक विभाग प्रमुख, धुळेकर मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी सदर कार्यक्रमास उपस्थित होते सर्व शिक्षक, विद्यार्थी, व आलेल्या पाहुणे यांचे महेश कौण्डिन्य यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन. आर. ठाकरे, महेश चिंचोले व सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.