श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा येथे डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

0

पाचोरा ;- पी. टी. सी. संचालित श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक आनंद नवगिरे उपस्थित होते त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली यावेळी राकेश सपकाळे सर व संगीत शिक्षक सागर थोरात सर यांनी भीमगीते सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकून घेतली .

डी. डी. कुमावत अध्यक्षीय भाषणात मुख्यध्यापाक एस. डी. पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांचे कर्तृत्व व शिक्षण व्यवस्था यावर सविस्तरपणे माहिती सांगितली. यावेळी उपमुख्याध्यापक एल. एस. शिंपी, पर्यवेक्षिका पी. पी. पाटील, सी. एस. धुळेकर ,सांस्कृतिक प्रमुख प्रमिला वाघ ,पर्यवेक्षक पी. जे. पाटील , आहिरराव उपस्थित होते सूत्रसंचालन महेश कोडिण्य यांनी तर आभार उज्वल पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.