कोलंबोः जगभरात ईस्टर संडे साजरा होत असतानाच श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरामध्ये एकापाठोपाठ आठ साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच चर्चमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट करणाऱ्या सुसाइड बॉम्बरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या साखळी बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत तब्बल ३२१ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, ५०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. कोलंबोमधील सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये एक संशयित आत्मघाती हल्लेखोर शिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीमागे एक मोठी बॅग अडकवून एक व्यक्ती चर्चमध्ये येताना दिसत आहे.
#WATCH Colombo: CCTV footage of suspected suicide bomber (carrying a backpack) walking into St Sebastian church on Easter Sunday. #SriLankaBombings (Video courtesy- Siyatha TV) pic.twitter.com/YAe089D72h
— ANI (@ANI) April 23, 2019