श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट ; पुगोडा शहर स्फोटांच्या आवाजाने हादरले

0

कोलंबो :- श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहर आत्मघाती साखळी बॉम्बस्फोटाने हादरले असताच आज पुन्हा एकदा कोलंबोपासून ४० किलोमीटर असलेल्या पुगोडा हे शहर स्फोटांच्या आवाजाने हादरले आहे.

पुगोडातील स्थानिक कोर्टाच्या इमारतीजवळील मोकळ्या जागेवर हे स्फोट झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे स्फोट नेमके कशामुळे झाले याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असतानाच श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरामध्ये एकापाठोपाठ आठ साखळी बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत तब्बल ३२१ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, ५०० हून अधिक जण जखमी झाले झालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.