जळगांव:- महात्मा फूले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सयुंक्त जयंती महोत्सवानिमित्त मेहरून येथील श्रीराम विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जळगांव महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व जनसेवा विचारधारा फाऊंडेशन यांनी सयुंक्तपणे आयोजित केलेल्या स्पर्धेत श्रीराम प्राथमिक,माध्यमिक व कन्या शाळेतील ३००, विद्यर्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस महात्मा ज्योतिबा फूले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर स्पर्धेचे उदघाटन भारत ससाणे यांनी केले.अध्यक्षस्थानी मुकुंद सपकाळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम तरुण मंडळ संचलित शाळेचे सचिव अशोक लाडवंजारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद (पिंटू) सपकाळे, दत्तात्रय तायडे,दिलीप सपकाळे,जनसेवा विचारधारा फाऊंडेशन चे निलेश बोरा नगरसेवक अनिल देशमुख यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिभा पाटील, संजय बडगुजर,संगीता कुलकर्णी, काठीEदिनेश पाटील,अतुल चाटे, संनो पिंजारी,राजश्री तायडे,प्रवीण पाटील,अमित तडवी, ,प्रणाली पालवे, अमोल वंजारी, जनसेवा विचारधारा फौंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरा,आंबेडकर जयंती महानगर उत्सव समितीचे गमिर शेख, किरण वाघ, भारत सोनवणे,समाधान सोनवणे, शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी मनोहर पाटील,भगवान वंजारी,धनंजय सोनवणे,संतोष चाटे,विनोद इखे आदीनि परिश्रम घेतले.