भडगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण भारतात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाची सुरवात झाली. भडगाव येथे बाजार चौक येथील श्रीराम मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक समरसता राखून आरतीचा मानहा जोसेफ मरसाळे अजय कंडारे, देवदत्त सोनवणे, पंडित अहिरे, सुरेश सोनवणे यांना देण्यात आला होता.
महा आरतीला मोठ्या प्रमाणात राम भक्त हजर होते.महाआरती झाल्यानंतर भडगाव शहरात निधी समर्पणाची सुरवात झाली. भडगाव शहरात निधी समर्पणसाठी उस्फुर्त असा प्रतिसाद शहरवासियांकडून मिळत आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ.निलेश पाटील तालुका संघचालक डॉ.प्रफुल्ल पाटील, निधी समर्पण अभियानाचे प्रमुख नाना हडपे, वि. हीं. प. चे मिलिंद बोरसे,भाजपचे ता.अध्यक्ष अमोल नाना पाटील,मा.ता.अध्यक्ष सोमनाथ पाटील,रवींद्र पाटील, विकास महाजन,लोकेश जैन,शाम मुसांडे,विशाल चौधरी,दीपक कासार,विवेक शिरसाठ,चेतन कासार, ऍड.निलेश तिवारी अमोल सोणजे व इतर रामभक्त उपस्थित होते हे अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी चालणार आहे व यात संपूर्ण भडगाव तालुक्यातून निधी समर्पण केले जाणार आहे.