Monday, January 30, 2023

श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाचे आज उद्घाटन

- Advertisement -

चोपडा – आयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीच्या पावन तिर्थक्षेत्रावर विशाल राम मंदिर निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे.या मंदिर निर्माणात प्रत्येक भारतीयाचा सहभाग असावा यादृष्टीने निधी संकलन केले जाणार आहे.चोपडा तालुक्याचे निधी संकलन कार्यालयाचे आज दि.१३ रोजी बुधवारी दुपारी ४ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.

शीतलनाथ मठाजवळ, गुजरअळी येथे असणाऱ्या या कार्यालयाचे उद्घाटन वर्डीच्या सुकनाथ बाबा मठाचे मठाधिपती प.पू.दीनानाथ महाराज,अ.भा.वारकरी संप्रादयाचे तालुका उपाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पुनगावकर तसेच श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख रामदास बंडू पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तरी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीराम प्रेमी जनतेने उपस्थिती देण्याचे आवाहन श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीने केले आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे