श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर मध्ये हरी सिंह हाईट स्ट्रीटजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सात जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त असूनही हा हल्ला झाला. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त आहे.
Jammu and Kashmir: Search operation underway at Hari Singh High Street in Srinagar following a grenade attack earlier today. More details awaited. pic.twitter.com/q0ETOUukJ7
— ANI (@ANI) 12 October 2019
हरी सिंह हाय स्ट्रीट मार्केटमधअये हा ग्रेनेड हल्ला झाला. लाल चौकपासून शंभर मीटर अंतरावर हे मार्केट आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी या भागाला घेराव घातला असून इथे शोध मोहिम सुरु आहे.जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ शोध मोहिम राबवत आहेत. या भागातील दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाच ऑक्टोंबरला दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये ग्रेनेड फेकले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या या हल्ल्यात १४ जण जखमी झाले होते.

