श्रीक्ष्रेत्र कुरंगी ते श्रीक्षेत्र शिर्डी पदयात्रा दिंडीचे प्रस्थान

0

पाचोरा:- रामनवमी निमित्ताने मागील ८ वर्षांपासून कुरंगी येथून साईबाबाच्या शिर्डी नगरीत गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवशी कुरंगी येथून निघून रामनवमीच्या दिवसी सकाळी ही पायीदिंडी शिर्डीत दाखल होते. गावातील व परीसरातील नवतरुण कुरंगी साई मंदीरावर एकत्र येऊन तेथून गावात पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. नंतर साईबाबा चे पादुका पुजन व पालखी पुजन चा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होऊन आरती करून दिंडीचे प्रस्थान होते.

या पायीदिंडीला हे ९ वे वर्ष आहे. दिंडीचे एकूण ६ मुक्काम असून सातव्या दिवशी रामनवमीच्या सकाळी दिंडी शिर्डीत दाखल होते. दिनांक ७ एप्रिल रोजी तारखेडा मुक्काम, ८ एप्रिल ओझर, ९ एप्रिल नस्तनपूर, १० एप्रिल खिर्डी, ११ एप्रिल नगरसूल,१२ एप्रिल कोपरगांव, व दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी दिडी शिर्डीत दाखल होते. दरकोस दर मुक्काम करत दिंडीला संपूर्ण जेवण व नास्ता पाण्याची व्यवस्था केली जाते. दिंडीचे चालक पत्रकार नगराज पाटील, आबा मोरे, सुनिल पाटील, संभाजी शंकपाळ, नामदेव पाटील, कैलास चव्हाण यांचे मार्गदशन लाभते. तर दिंडी यशस्वीतेसाठी सरपंच दिपक मोरे, माजी सरपंच गजानन पवार, ज्ञानेश्वर साखरे, परमेश्र्वर पाटील, विजय ठाकरे, युवराज पवार, सुदाम ठाकरे, यांच्या सह गावातील भाविक भक्त परीश्रम घेतात.

Leave A Reply

Your email address will not be published.