श्रीक्षेत्र नागेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी, महाप्रसादाचा वाटप

0

पारोळा प्रतिनिधी – शहरापासून 6 किमी अंतरावरील श्रीक्षेत्र नागेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज भाविकांनी दिवसभर गर्दी केली. व देवदर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसाद सेवन केला.

तालुक्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी श्रीक्षेत्र नागेश्वर हे हे एक ऐतिहासिक पुरातन तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त  मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, नवसाला पावणारे तीर्थक्षेत्रावर म्हणून भाविक हे दर्शनासाठी रांगा लावतात. आजदेखील पहाटे अभिषेक पूजनानंतर  रांगा या  लागल्या होत्या. आमदार चिमणराव पाटील, माजी राज्य मंत्री डॉ सतीश पाटील, माजी सभापती रेखाताई पाटील, नगराध्यक्ष  करण पाटील, नगरसेवक दीपक अनुष्ठान, सुधाकर पाटील, संजय पाटील, बापू महाजन, प्रकाश वाणी या पदाधिकारी यांनी दर्शनाचा लाभ घेतला.सायंकाळी उशिरा पर्यंत गर्दी कायम होती.

महाप्रसाद वाटप

महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी दरवर्षी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम हा भाविककांकडून करण्यात येतो. विजय शिंदे, पुंडलिक शिंदे, अशोक पाटील, अतुल देशमुख, यांचा कडून साबुदाणा व राजगिरा लाडू हा महाप्रसाद वाटप करण्यात आला. तर विजय निकम विचखेडे, दादा पाटील, अरुण बधान नाशिक, नरेंद्र ब्राह्मणकर या भाविकांकडून आणि भक्तांना आर ओ चे शुद्ध पाणी पाजण्यात आले. या तीर्थक्षेत्रावर आज दिवस भर गर्दी पाहण्यास मिळाली. शिवरात्री निमित्त परिसरातील शेकडो छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी आपली दुकाने थाटतात त्यामुळे लाखो रुपयांचा व्यवहार येथे होतो.  अनेक शेतकरी व शेतमजूर बांधव या यात्रेचा व त्यातील साहित्य खाद्यपदार्थाचा लाभ घेतात. या महाशिवरात्र यात्रा यशस्वीतेसाठी  उंदीरखेडे ग्रामपंचायत, उपसरपंच गणेश पाटील, कलावंत नेतकर, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ हे परिश्रम घेतात.

उद्या कुस्त्यांची दंगल

महाशिवरात्रीनिमित्त दुसर्‍या दिवशी या ठिकाणी कुस्त्यांची दंगल ही दरवर्षाप्रमाणे घेण्यात येते. भांड्यांवर व रोख बक्षिसे दिली जातात.  परिसरातील पहिलवान कुस्त्यात सहभाग घेऊन यात्रेची शोभा वाढवितात यासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक या कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी करतात.

दरम्यान यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व पोलीस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवतात. श्रमदान करणाऱ्यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.