निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात पडोनी ऊन पडे या कवीने गायीलेल्या कविते प्रमाणे यंदा श्रावण महिन्याचे वैभव दिसून येत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. श्रावण महिना लागून जवळ जवळ १५ ते २० दिवस उलटली आहेत. परंतु क्षणात पावसाचा क्षण दिसत नाही याउलट कडक उन्हच जास्त पडत असल्याने क्षण पावसाचा नैसर्गिक खेळ मात्र श्रावणात दिसून आला नाही. परंतु उन्ह एवढे पडले की शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकरी शेत मजुराला भाजून काढून अंगावरील चामडी काळी पाडून टाकली आहे.
अवघ्या आठ दिवसांनी श्रावण महिना संपणार असून क्षणात पाऊस पाडण्याचा जणू निसर्गाला विसरच पडला आहे सध्या पिके जंगल डोंगर दर्या हिरवीगार दिसत असली तरी पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांना पाण्याची अवशकता भासत असून शेतकरी वर्ग पावसाची प्रतीक्षा करु लागले आहेत दररोज पाऊस येण्या सारखे वातावरण होते ढगही भरुन येतात मात्र पाउस काही पडत नाही. ऐन मौसमावर पावसाने तानून दिले असल्याने पिकांना झटका बसून उत्पंन्नावर काही परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज ना उद्या जरी पाऊस पडला तर निश्चितच फायदा होईल असे शेतकरी निश्कर्ष काढत आहेत.