श्रमदानातून घडणार चाळीसगाव तालुक्यात जलक्रांती ; बैठकीत उमटला श्रमजीवींचा सुर

0

चाळीसगाव – तालुक्यात नूकतीच पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सुमारे ७० गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवित श्रमदानातून जलसमृद्धीची चळवळ उभारण्यासाठी अतोनात परिश्रम घेतलेत.यात आबालवृद्धांपासून तर बाळगोपाळांपर्यंत सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदवित जलसमृद्धीसाठी पुढाकार घेत श्रमदान केले या औचित्यपर ‘जलसंधारणासोबत मनसंधारण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते,चर्चेदरम्यान श्रमजीवींनी आपल्या भावना व्यक्त करीत भविष्यकालीन तरतुदीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.यावेळी आयकर आयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण,चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर,देवरे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.उज्वला देवरे,हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील,आयबीएन लोकमतचे प्रफुल्ल साळुंखे,नगरसेविका सविता राजपूत,शेखर निंबाळकर,स्वप्नील कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते

जलसंधारणातून मनसंधारणाकडे, ध्यास जलक्रांतीचा या विषयावर रांजणगाव विकास मंच,निंबाळकर फाउंडेशन,जलसाक्षर अभियानाचे स्वप्नील कोतकर यांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील केमिस्ट भवनात सुमारे ५ तास चाललेल्या चर्चासत्रात अनेक श्रमजीवींनी श्रमदानात उद्भवलेल्या अडीअडचणी व समस्यांवर मात करीत श्रमदान यशस्वी केल्याचे सांगितले.चाळीसगाव तालुका राज्यातील पहिला सुजलाम सुफलाम तालुका झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद श्रमजीवींनी व्यक्त करीत भविष्यातील पाण्याचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करणार असल्याचे सांगत निसर्ग समृद्धीसाठी सदैव तत्पर असल्याच्या भावना व्यक्त केल्यात

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी तालुक्यातील श्रमजीवींनी परिश्रम घेतले असून पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता वैयक्तिक,कौटुंबिक,आर्थिक व सामाजिक जबाबदारी सांभाळून तन मन धनाने आपल्या गावाच्या शिवारात माथा ते पायथा पाणलोटाचे उपचार करीत जलक्रांतीचे साक्षीदार होऊन गाव पाणीदार होण्यासाठी एकजुटीने लढा देत असलेल्या जलयोद्धे हे जणू भगीरथ ठरले आहेत असे उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी यावेळी सांगितले

तालुका भविष्यात दुष्काळमुक्त करण्यासाठी श्रमजीवींनी सर्वार्थाने केलेले श्रमदान निश्चितच भविष्यातील जलक्रांती घडविणार आहेत.केवळ दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपल्यातील ‘मी’ पणा न बाळगता केलेले निस्वार्थी कार्य कौतूकास्पद राहिले असल्याचे डॉ.विनोद कोतकर यांनी सांगितले तर प्रामाणिक अन त्यागी भावनेनं केलेले काम सफल होत असते याचा प्रत्यय शेतशिवारात दिसणार असल्याचे डॉ.उज्वला देवरे यांनी सांगितले तर निपक्षपाती भावनेनं पुढे आलेल्या श्रमदात्यांच्या मेहनतीची फलश्रुती आत्मसमाधानी असल्याचे सुचित्रा पाटील यांनी सांगितले.स्पर्धा संपली असली तरी,आपल्या मनामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी श्रमदाते हे ध्येयवेडे ठरले असल्याचे मत प्रफुल्ल साळुंखे यांनी समारोपप्रसंगी व्यक्त केले

यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या प्रीती रघुवंशी,वैशाली काकडे,अनिता शर्मा,प्रा.तुषार निकम,सचिन राणे,अमोल वाघ,शालीग्राम निकम,शांताराम पाटील आदी उपस्थित होतेत तर सोनाली निंबाळकर,सोमनाथ माळी,प्रदीप सोनवणे,योगेश साळुंखे,आर.डी.पाटील,आरस्था माळदकर,प्रमोद चव्हाण,कोमल पाटील,आकांक्षा निकम,निखिल कच्छवा,गोकुळ पाटील,कैलास पाटील,रामचंद्र सोनवणे,अनिल गायकवाड,राहुल राठोड,प्रल्हाद सोनवणे,पंकज पाटील आदी श्रमजीवींनी भावना व्यक्त केल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.