अमळनेर येथील घटना ; खड्डा बुजविण्याची मागणी
अमळनेर ;-
शहरातील गांधलीपुरा भागातील पारधी वाड्यात शोष खड्ड्यात सायकल खेळत असताना दोन वर्षांचा बालक पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज येथे घडली . यामुळे परिसरात हालहाल व्यक्त होत असून नगर पालिकेने हा शोष खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील गांधलीपुरा भागात पारधीवाड्यात दोन वर्षीय बालक अजय रंगराव चव्हाण हा सायकल खेळत असताना जवळच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी शोष खड्डा तयार करण्यात आला आहे यात तोल जाऊ चिमुकल्या अजयचा त्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली .
शोष खड्डा जवळ पालिकेचे नदीकाठी संरक्षण भिंत व रस्त्याचे काम सुरू आहे. सांडपाण्याचे विल्हेवाट व्हावी म्हणून सदर ठिकाणी हा खड्डा तयार करण्यात आला होता. या ठिकाणी या परिसरातील लहान मुले कायम खेळत असल्याने हा खड्डा बुजविण्यात यावा म्हणून येथील काही रहिवाश्यांनी अमळनेर न.पा.कडे खड्डा बुजविण्याची विनंती केली होती . मात्र न.पा.ने दुर्लक्ष केल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला मयत बालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गरीब कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
