श्रीनगर :- जम्मू-काश्मीरच्या शोपियाँमध्ये सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. . या ठिकाणी दुपारपर्यंत चकमक सुरुच होती. काश्मीरचे पोलीस अधिकारी एस. पी. पानी म्हणाले, या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
#UPDATE: Two terrorists have been killed by security forces in Shopian. #JammuAndKashmir https://t.co/cQIkVxvfnn
— ANI (@ANI) 13 April 2019