शिदाड, ता पाचोरा (प्रतिनिधी) : शेवाळे येथे महिलांना घरातील केरकचरा गावाच्या बाहेर नेऊन टाकायला जावे लागत असे हे ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच व सदस्य यांच्या लक्षात आल्यामुळे गावातील महिलांना होणार त्रास लक्षात घेऊन संपूर्ण गावात कचराकुंडी चे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच श्री. योगेश कौतिक पाटील , उपसरपंच शांताराम वाघ, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील , अनिल पाटील, भागाबाई मांगगारोडी, हरीचंद्र भगूरे, लताताई विश्वासराव भोसले,सुनीता भगवान पांडे, नपिसा तडवी पो. पा- अरुण पाटील, ग्रामविकास अधिकारी – श्री. संजय जाधव तंटामुक्ती अध्यक्ष- भगवान पांडे ,ग्रामपंचायत कर्मचारी राजू वाघ, नवनीत जैन, गौतम गायकवाड उपस्थित होते.