शेळावे ता. पारोळा | प्रतिनिधी
शेळावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ एन एस चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव व डॉ डी एम पाटोडे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील महाराष्ट्रातील पहिले मेडल हेल्थ क्लिनिकचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र शेळावे बु. येथे 10ऑक्टोंबर जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाचे मानस तज्ञ डॉ दौलत निमसे यांनी प्रस्तावना व मानसिक आरोग्यविषयी माहीती देताना अती ताण तणवाची लक्षणे. मानसिक आजाराची लक्षणे व महीन्याच्या प्रत्येक गुरूवारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेळावे बु येथे समुपदेशन व उपचार करण्यात येतील. या बाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रांजली पाटील हे होते व यांचे हस्ते उद्दघाटन करण्यात आले व 12रूग्णाचे समुपदेशन करून टोकण देउन जिल्हा रुग्णालयात जळगाव येथे संदार्भित करण्यात आले अध्यक्ष भाषणात डॉ प्रांजली पाटील यांनी उदासिनता चिंतेचे विकार अती उत्साह व व्यसनाधीनता यावर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा स्तरावरून कार्यक्रमासाठी प्रकाश येवले जिल्हा व्यवस्थापक. किशोर पाटील. संदीप शिरसागर. श्रीमती ज्योती पाटील. मनोज नंनवरे. सतीश सांगरे उपस्थित होते. मेडिकल ऑफीसर डॉ योगेश सांळुखे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी श्री बागुल. सातपुते. भुषण पाटील. अशोक माळी.ं ज्ञानेश्वर पाटील. आर वाय पाटील. रवींद्र शिंपी. अनिल पाटील. शामकांत पाटील. जी बी सोनवणे यांनी परीश्रम घेतले सर्व आरोग्य सेवक. आशा स्वयंसेवीका व ग्रामस्थ उपस्थित होते.