शेलगाव गावातील आदर्श शेतकऱ्याचा महा प्रताप!

0

मात्र अनिता व शुभम बचत गटास कोणत्याच प्रकारची कल्पना नाही बचत गटाच्या महिलांचा उग्र संताप!

मुरबाड | प्रतिनिधी 

मुरबाड तालुक्यातील शेलगाव गावातील आदर्श शेतकऱ्याचा महा प्रताप अनिता स्वयंसहाय्यता बचत गट व शुभम स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या नावे घेतली बोगस कर्ज बचत गटाच्या महिलांना मात्र कोणत्याच प्रकारची माहिती नसल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर इस मास मुरबाड कृषी विभागाने आदर्श शेतकरी पुरस्कार दिलेला असून बाळू नारायण मुरेकर यांनी आदिवासी महिलांना गंडा घालण्याचे  काम केले आहे आदर्श शेतकऱ्यास काही राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याने अनेक आदिवासी लोकांच्या योजना घशात घातले आहेत. अनिता स्वयंसहाय्यता बचत गटा मधून शेळीपालन गट कर्ज व शुभम स्वयंसहाय्यता बचत गटा मधून अवजार बँक योजना अशा प्रकारचे दोन कर्ज घेऊन अनिता बचत गटातील आदिवासी महिला शुभम बचत गटांमध्ये दाखवून त्यांच्या खोट्या सह्या करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने योजना घशात घातल्याचे बचत गटाच्या महिलांकडून सांगितले जात आहे या गावातील वर्धिनी आरती देसले आम्ही काही न करता आमच्या नावे सदर योजना चे कर्ज घेतले असून आदिवासी महिलांना व आम्हाला कोणत्याच प्रकारची कल्पना नसताना योजना वाटप कशी केली असा सवाल आरती देसले व आदिवासी महिलांकडून व्यक्त होत आहे या दोन्ही कर्जांची चौकशी होऊन सदर बाळू नारायण मुरेकर व त्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आमची फसवणूक केल्याप्रकरणी व शेळीपालन कर्ज अवजार बँक योजना सदर महिलांना आदिवासी महिलांना देण्यात यावे अन्यथा आम्ही पंचायत समिती समोर बचत गटाच्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आदिवासी महिलांनी व वर्धिनी आरती देसले यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.