पारोळा, प्रतिनिधी शेळावे येथे दिनांक २७ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून स्वतःच्या मालकीच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता मोहाडी तालुका पारोळा शिवारातील विहिरीत ज्ञानेश्वर संतोष सांगळे वय२४हा आपल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात मोहाडी शिवारात दिनांक २७ रोजी सायंकाळी शेतात पाणी भरण्यासाठी गेला असता दिनांक २८रोजी सकाळी ७वाजेपर्यंत तो घरी न आल्याने शेत परिसरात त्याचा शोध घेतला असता,तो विहिरीत पडलेला दिसला.तेव्हा त्यास विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून खाजगी वाहनाने कुटीर रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले.गोकुळ पांडुरंग सांगळे यांच्या खबरे नुसार पारोळा पोलीस स्टेशन येथे हे भा.द.वि. कलम १७४नुसार फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते हे करीत आहे.