भुसावळ (प्रतिनिधी) :– शेतक-यांना बँकेमार्फत होणारा कर्जपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान महाजन सर यांनी केली असून याबाबतीत व्यवस्थापकीय संचालक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड,यांना बुधवार ३ रोजी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद आहे की, बँके मार्फत विविध कार्यकारी सोसायटी द्वारा होणारा कर्जपुरवठा हा महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत
कर्जमाफ झालेल्या शेतक-यांना २०१६-१७ च्या तुलनेत फक्त २५ टक्के सुरू असल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
आपली बॅक शेतकऱ्यांची बँक असल्याने शेतकऱ्यांना सोडून इतरांना जास्तीची कर्ज वाटप करून आपण शेतकऱ्यांना सोबत मोठा अन्याय करीत आहात तरी आपण सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांची होणारी कुचंबना थांबवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेना स्टाइलने पुढील आंदोलन करण्यात येईल व भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस आपण जबाबदार राहाल कारण कर्ज पुरवठा वेळेवर व पुरेसा झाला नाही तर पुन्हा शेतकरी पेरणीच्या तोंडावर हवालदिल झालेल असेल तरी त्वरित पुरेसा कर्जपुरवठा करावा व शेतकऱ्यांना दिलासा दयावा अशी मागणी शिवसेनेतर्फे शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे .