तुमचा पाया पळतो साहेब मला पण बागातदार बनवा शेतकऱ्यांचा आक्रोश
पारोळा प्रतिनिधी तालुक्यातील होळप्रिंप्री येथील वसंत वना पाटील या शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री सौरकृषी पंप साठी पैसे भरून सुध्दा अधिकारी योजनेपासून वंचित ठेवत आहेत. एकाच गावातील तिन शेतकऱ्यांन पैकी दोन शेतकऱ्यांना लाभ मिळाला व एक शेतकऱ्यांला उळवाउळवी चे उत्तर मिळत आहेत. तुमचे अतिविकसीत गाव आहे. तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. असे सांगितले जात आहे. गावतील तीन शेतकऱ्यांचे पैकी दोन शेतकऱ्यांना लाभ आणि एकाला का नाही ? असा प्रश्न या शेतकऱ्यांने थेट मुख्यमंत्रीना पत्राद्वारे विचारला
शेतकऱ्यांने महावितरण च्या साईट वर जावून एल & टी कंपनीची निवड केली व त्यात महावितरण चा ऑपवर ते पेंडीग दिसत आहेत. गावातील दोन शेतकऱ्यांना मात्र परवानगी दिली आहे. सर्व कागदपत्रे व अॉनलाईन एक वर्षां पासून पैसे भरून सुध्दा मला योजने पासून अधिकारी वंचित का ठेवत आहेत. आसा प्रश्न उपस्थित करून या शेतकऱ्यांने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री,ऊर्जामंत्री,राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू , मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना पत्र लिहिली असून मला देखील बागायतदार शेतकरी बनण्यासाठी न्याय मिळावा असी विनंती वजा आक्रोश केला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.