शिरूड ता. अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपण्यात आला तरी, जून महिन्यामध्ये आमच्या भागात शिरूड मंडळांमध्ये वेळेवर पाऊस झाला असं वाटत असतांना शेतकर्यांनी पेरणी करून खत बियाणे लावून मोकळे झाले. पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला असं शेतकऱ्यांना वाटलं. परंतु जस जसा जून महिना संपत गेला तसा पावसाने दांडी मारायला सुरुवात केली.
कापसाचे पीक, ज्वारी, मक्याचे पीक देखील हातातून गेले आहे. आता पाऊस आला तरी शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळ जवळ एक महिन्याचा मोठं अंतर पडलेले आहे. शेतकऱ्यांचा जो खर्च होणारा होता, तो संपूर्ण खर्च झालेला आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि फार मोठं संकट शेतक-यांसमोर आज निर्माण झालेले आहे.
पाऊस न पडणे ही एक चांगली गोष्ट. निदान तेवढा शेतकऱ्यांचा खर्च तर वाचला असता. मात्र पाऊस पडून शेतकऱ्यांनी पिकांसाठी खत लावली गेली, निंदणी, कोळपणी केली, सर्व खर्च केला. मात्र आता पावसाने मोठे अंतर पाडले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर या गोष्टींची गांभीर्याने दखल घ्यावी.
परिसरामध्ये गुरांसाठी छावण्या चालू कराव्या आणि शेतकऱ्यांना थोडासा भरवसा द्यावा की, शासन तुमच्या पाठीशी आहे. तरी शेतकऱ्यांमध्ये थोडासा विश्वास निर्माण करावा. कापसाचे पीक बघितलं तर काही नाही. आता पाऊस आला तरी शेतकऱ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा होणार नाही. खरीप हंगामा पूर्णपणे गेलेला आहे तर जास्त पावसाचा उपयोग फक्त रब्बी हंगामाला होऊ शकतो.