शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून कपिल शर्मा संतापला; म्हणाला…

0

मुंबई । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता, कॉमेडियन कपिल शर्माने ट्विट केले आहे. शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून संतापलेल्या कपिल शर्माने या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन केले आहे.

”कुठलेही प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात. त्यामुळे या प्रश्नावरही सामंजस्याने तोडगा काढता येईल. याल प्रश्नाला राजकीय वळण देऊ नका’, असे आवाहन कपिल शर्माने केले आहे. ‘आम्ही सगळे देशवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तेच आपले अन्नदाते आहेत”, असे म्हणत त्यांने या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलन पाहता, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठकही बोलविण्यात आली होती, ज्यात गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हेदेखील सहभागी झाले होते. ही बैठक सुमारे 2 तास चालली

दरम्यान, आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चढ्ढा यांनी दिल्लीत शेतक-यांना निषेध करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना निषेध करायचा आहे, तिथे परवानगी देण्यात यावी. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करत केंद्र सरकारला शेतक-यांशी तातडीने बिनशर्त चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.