– अमोल शिंदे यांच्या मागणीला यश
पाचोरा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दि. ०७ जुन २०२० रोजी जनआक्रोश शेतकऱ्यांचा या आशयाचे विविध मागण्यांसंदर्भात जवळपास २० हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन मागण्या तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रहाची मागणी या निवेदनाद्वारे केली होती.
त्या निवेदनात पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत विमा काढलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात वर्ग करावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली होती. या मागणी संदर्भात यावेळी उपस्थित खासदार उन्मेष पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातुनच संवाद साधून जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात – लवकर त्यांचा लाभ मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. आणि त्याचा सतत पाठपुरावा करून दि. १७ रोजी जळगाव जिल्ह्याला उर्वरित पिक विमा रक्कम प्राप्त झाली आहे.
पाचोरा तालुक्यातुन या योजनेतुन प्रमुख पिक कापसासाठी ३ हजार ४८१ शेतकऱ्यांना १० कोटी, ३ लाख ४७ हजार,१४२ रुपये व तुर साठी ४६ शेतकऱ्यांना १ लाख ८३ हजार ७७ रुपये ऐवढी रक्कम प्राप्त झाली असुन भडगाव तालुक्यातील कापसासाठी २ हजार ८७१ शेतकऱ्यांना १ कोटी ९० लाख ७० हजार १८७ रुपये व तुर साठी ६ शेतकऱ्यांना २५ हजार ५०५ रुपये ऐवढी रक्कम प्राप्त झाली असुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग होईल तसेच या मागणीसाठी खासदार उमेश पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्न केले असुन आम्ही पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील पिक विमा धारक लाभार्थी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने खासदार उन्मेष पाटील यांचे आभार मानतो. असे भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
