तालुक्यातील शिवसेनेतर्फे शेतकरी बांधवांना विमा सहायता केंद्रांची स्थापना ; एकूण पाच केंद्र
भुसावळ :- भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे भुसावळ तालुक्यात शेेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे तसेच शेतकऱ्यांना ज्या ज्या कंपनीमार्फत पिक विमा काढलेला आहे त्याचा कंपन्यांमार्फत योग्य त्या अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विम्याची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य व्हावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर व जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने भुसावळ तालुक्यात एकूण पाच शेतकरी पिक विमा सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहेत.तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मदत केंद्रात जाऊन आपला अर्ज भरून सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे .
सदर केंद्र डी एस हायस्कूल कॉम्प्लेक्स कोर्टासमोर भुसावळ, राम मंदिर भुसावळ, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांचे संपर्क कार्यालय बस स्टॅन्ड चौक वरणगाव तसेच शिवसेना कार्यालय तळवेल आणि शिवसेना कार्यालय साकेगाव अशी पाच केंद्रे असून या केंद्रांवर शेतकऱ्यांनी संबंधित फॉर्म भरून देऊन आपला पिक विमा काढलेला असल्याचे माहिती तसेच बँक हजार बाबत संपूर्ण माहिती बँकेचे नाव बँकेचा पत्ता याबाबत सविस्तर विवरण लिहून सदरचा अर्ज कार्यालयात जमा करावे जेणेकरून संबंधित बँक व संबंधित विमा कंपनी यांच्याशी संपर्क करून शिवसेना पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संबंधित कंपनीकडून आपणास नुकसान भरपाई मिळणार आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात सोपे होईल संबंधित केंद्रांसाठी शिवसेना भुसावळ शहर प्रमुख नीलेश महाजन उत्तर विभाग बबलू ब-हाटे दक्षिण विभाग यांची भुसावळ शहरासाठी पिक विमा सहाय्यता केंद्र समन्वयक म्हणून तसेच निलेश सुरडकर विधानसभा क्षेत्र संघटक यांची वरणगाव येथील केंद्रासाठी हिरामण पाटील उपतालुकाप्रमुख शिवसेना यांची साकेगाव केंद्रासाठी तसेच प्रकाश कोळी गटप्रमुख शिवसेना यांची तळवेल केंद्रासाठी समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे या कार्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवासेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत असे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी कळविले आहे .