शेतकऱ्यांना आर्थिक मदत निधी त्वरित मिळावा -जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

जळगाव-२०१९ या वर्षातील जळगाव जिल्हाभरामधून आलेली आत्महत्या ग्रस्त शेतकरी प्रकारणे  याबाबत आपण आणि आपल्या समितीने मुख्यमंत्री मदत निधीसाठी अपात्र ठरविलेली असून अशी संपूर्ण प्रकरणे तात्काळ पात्र ठरविण्यात यावे या आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबियांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावी या बाबत भारतीय युवा लोकशाही जनक्रांती मोर्चाच्या वतीने २जानेवारी गुरुवार रोजी जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले.

मागील २०१९ या वर्षाला संपूर्ण महाराष्ट्रभर नैसर्गिक आपत्ती चे संकट  बळी राजावरती कोसळले आहे  त्यात पिकाचे अतोनात नुकसान झाले असून जिल्ह्यात  नापिकी सदृश्य  परिस्थिती निर्माण झाली आहे.यात  जळगाव जिल्ह्याचा  देखील  समावेश असून  आत्महत्या ग्रस्त शेतकरी प्रकरणे जी काही २००६पासून अपात्र ठरविलेली आहेत. अशी प्रकरणे पूर्व आणि आग्रलक्षी प्रभावाने २०१९ ची संपूर्ण पात्र ठरविण्याच्या दिशेने योग्य ती पूर्तता  पूर्ण करून  आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबियांना त्वरित मुख्यमंत्री मदत निधी उपलब्ध होईल याबाबत कार्यवाही पूर्ण करून सदरील आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना न्याय देण्यात यावा  यावेळी प्रताप पवार(एरंडोल)अनिल नावेकर. दीपक गुप्ता. ईश्वर मोरे. मुकुंद सपकाळे. सुभाष वाघ. याच्या निवेदन  पत्रकावर स्वाक्षऱ्या आहे व उपस्थित होते.        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here