शेतकऱ्यांच्या नुुकसानी पोटी हेक्‍टरी ८ हजार रुपये प्रमाणे अनुदानात घोळ

0

फैजपूर (प्रतिनिधि) :   2019 अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी मध्ये सापडला. त्यावेळी तत्कालीन महाराष्ट्र मधील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी आठ हजार रुपये प्रमाणे अनुदान मंजूर केले व निधी उपलब्ध करून दिला निधी उपलब्ध झालेला असताना आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत त्यांचे वितरण करायचे होते परंतु या यावल तालुक्यांमध्ये निधी वितरण करताना बराच घोळ झालेला आहे हे निधी वाटपात नाव एका यादीत तर खाते नंबर दुसऱ्याचा तसेच आजपर्यंत साधारण 2 हजार 100 शेतकऱ्यांना निधी मिळालेला नसून आपल्या कार्यालया कडून माहिती घेतली असता निधी हा मुदतीच्या आत प्रशासनास परत पाठविला आहे त्यामुळे तालुक्यातील 2हजार1 00 शेतकऱ्यांना विनाकारण तहसील कार्यालयात फिरावे मारायला लागत असून मनस्ताप होत आहे सदर निधी हा कशासाठी परत पाठवण्याची घाई करण्यात आली तसेच अनुदान वाटपामध्ये हे निष्काळजीपणा  झालेला दिसून येतो सदर हलगर्जीपणा केलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून संबंधित कर्मचारी तहसीलदार यांची चौकशी होऊन कडक कारवाई करावी अन्यथा या विरोधात यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे पंधरा दिवसानंतर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना भारतीय जनता पार्टी यावल शहर विद्यमाने देण्यात आले आहे .

सदर निवेदन देतेवेळी पंचायत समिती यावल माजी सभापती भरत महाजन, भाजपा यावल शहराध्यक्ष डॉ नीलेश गडे, परेश नाईक, फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील, मच्छिंद्र चौधरी ,माजी शहराध्यक्ष संजय रल, संजय भावसार, सुनील वर्मा ,आदी उपस्थित होते सदर निवेदनावर भरत महाजन तालुकाध्यक्ष उमेश हेगडे निलेश गडे , परेश  नाईक,अनंता नेहेते ,संजय सराफ, किशोर पाटील ,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.