- बलुन बांधाऱ्यासह पाडळसे, लोंढे, वरखेड प्रकल्पाच्या काम पूर्ण करणार
- पाचोऱ्यात खा.उन्मेश पाटील यांचा सत्कार
पाचोरा | प्रतिनिधी
खानदेशातील शेतकरी अतिशय मेहनती असूनही केवळ पाण्या ज्याची दुर्दशा झालेली आहे. यामुळे शेतकऱ्याचे चेहऱ्यावर हसू आणायचे असेल तर पाण्याशिवाय तरोनोपाय नाही. शेतकऱ्यांचे शेतीला पाणी मिळण्यासाठी मतदार संघातील गिरणा नदिवर सात बलुन बंधारे, पाडळसे, लोंढे-वरखेड व उतावळीचे पाणी बहुळात टाकुन नारपार योजनेस प्राधान्य दिले जाणार असल्याचे नवनिर्वाचित खा. उन्मेश पाटील यांनी सांगितले. पाचोरा येथे शिवसेना – भाजपा महायुतीच्या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, भाजपाच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. अस्मिता पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, मधुकर काटे, डी. एम. पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, भडगांवचे अमोल पाटील, अमोल शिंदे, सुनिता पाटील, पं. स. सभापती बन्सीलाल पाटील, डॉ. संजीव पाटील, सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. गणेश पाटील, गणेश परदेशी, प्रा. समाधान पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, अरुण पाटील, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, अॅड. दिनकर देवरे, नंदु सोमवंशी व्यासपिठावर होते.
सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात….