यावल ( प्रातिनिधी )कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर केळी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असून, कमी भावाने केळी खरेदी करणाऱ्या केळी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ बंडू सिंग पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतला आहे
याबाबत, यावल कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती तुषार पाटील यांनी उपसभापती योगराज बऱ्हाटे, संचालक नारायण चौधरी, राकेश फे ग डे, उमेश पाटील आदींची फोनवर कॉन्फरन्स द्वारे माननीय जिल्हा पालक मंत्री ना . गुलाबराव पाटील तसेच परिवहन मंत्री ना .परब साहेब यांच्याशी चर्चा करून यावर उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. याबाबत चोपड्याचे आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे माजी आमदार हरिभाऊ जावळे मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येऊन त्यांनीसुद्धा वरिष्ठांची संपर्क साधला आहे
ज्या शेतकऱ्यांची केळी काटुन व्यापारी वर्गाकडुनफसवणूक होत आहे, व्यापारी बोर्डभावापेक्षानिम्म्याने कमी किंमतीत केळी काटली जात आहे . अशा केळी व्यापाऱ्यांविरुद्ध शेतकरी बाजार समितीकडे तक्रार आल्यास समितीसाठी. जे व्यापारी कमी भावाने खरेदी करतांना आढळून आल्यास त्यांचे लायसेन्स निलंबीत करण्याचे अधिकार सचिवांकडे देण्यात आलेले असून, दप्तर तपासणी तसेच योग्य ती शहानिशा करून संबंधीत व्यापाऱ्याच्या बँक अकाऊंट सि ल करणे किंवा कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल असे सभापती तुषार उर्फ मुन्ना सांडू सिंग पाटील यांनी सांगीतले.
अमृतसर, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात व व ठिकाणच्या मंडी मध्ये केळीला वाढती मागणी आहे 40 ते 50 रुपये किलो ची केळी त्याठिकाणी पिकलेली विकली जात आहे बाजार समितीने संबंधित राज्यातील प्रत्येक मंडीशी
यासंदर्भात चर्चा केली असता केळीला उठाव आहे असे सांगण्यात आले मात्र या परिसरात व्यापारी वर्ग शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ टाकत असून लवकर करोडपती होण्याची त्यांची मानसिकता दिसून येत आहे ट्रान्सपोर्ट च्या गाड्यांना शासनाकडून ” ईं ” पास देण्यात येत असल्याने आता वाहतुकीचा मार्ग मोकळा झालेला असून डिझेलची सुद्धा “ई ” पास मुळे सुरळीत रित्या व्यवस्था झालेली आहे तर केळी वाहतूकदारां साठी सुद्धा प्रशासनाशी चर्चा करून त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक करू नये अशी ताकीदही कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात येत आहे