शेतकरी सल्लागार समीतीच्या (आत्मा) अध्यक्षपदी सोमनाथ पाटील यांची नियुक्ती

0

भडगाव (प्रतिनिधी) :

कृषी विभागाच्या तालुका शेतकरी सल्लागार समीतीच्या (आत्मा) अध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांची

नुकतीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता देऊन नियुक्ती घोषीत करण्यात आली. २३ जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या तालुका शेतकरी सल्लागार समीतीची (आत्मा) मुदत संपल्याने नव्याने दोन वर्षासाठी समीती घोषित करण्यात आली. तालुका समीतीच्या अध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून पं स सदस्या अलकाताई पाटील (आमडदे), पं स सदस्या तथा बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या जिल्हा संयोजिका डाॅ. अर्चना पाटील (वडगाव), माजी सरपंच रणजीत भोसले (आमडदे), आशाबाई रतिलाल पाटील (गोंडगाव), सुरेखाबाई प्रमोद पाटील (पिंपरखेड), परूषोत्तम सोनवणे (शिंदि), सुनील पाटील (सावदे), शोभाबाई बैरागी (वाडे), अंकीता किशोर पाटील (गुढे), शैलेश पाटील (वाडे), युवराज सोमा पाटील (भडगाव), खटाबाई दगडू महाजन (कोळगाव), मनिषा संजय पाटील (देव्हारी), सुनिता भोसले (भडगाव पेठ), संगीता परदेशी (भडगाव) प्रमोद पाटील (भडगाव पेठ), कीरण पाटील (आमडदे), यशंवत पाटील (गुढे), विनोद नेरकर (पळासखेडे), मनोज पाटील (भडगाव), सुनील पाटील (वडगाव), अनील पाटील (वडजी) व बन्सीलाल परदेशी (भडगाव) यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या शिफारवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडीस मान्यता दिली. सर्व सदस्यांना नियुक्ती संदर्भात आत्मा चे प्रकल्प संचालकाचे पत्र आले आहे. निवडीबद्दल पाटबंधारे तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खा. ए टी पाटील, आ. स्मिता पाटील, आ. उन्मेश पाटील, ना. उज्ज्वला पाटील, आ. चंदू पटेल, ता. सम्नवय अध्यक्ष डाॅ संजीव पाटील व भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील पत्रकार सागर महाजन यांनी अभिनंदन केले

Leave A Reply

Your email address will not be published.