पारोळा– प्रतिनिधी
शेतकरी हा शेतीतला खरा शास्त्रज्ञ असून तो आपल्या प्रायोगिक अनुभवावरून आपल्या अनुभवाच्या निष्कर्ष द्वारे पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पन्न कसे पदरात पडेल यासाठी भर देत असतो
शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात व तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचतील यासाठी कृषी विभाग आपले कर्तव्य बजावत असते व त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत निश्चितच पोहोचवाव्यात असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी निर्देश दिले
शेतकरी संघटना पारोळा यांनी पाहणी दौरा दळवेल येथे जाऊन कृषिमंत्र्यांना निवेदन दिले व त्यात शेतकऱ्यांना खरीप 2019 2020 या वर्षाचा शेतकऱ्यांनी घेतलेला पिक विमा अतिवृष्टीने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीस पात्र ठरले असून विमा कंपन्यांनी लवकरात लवकर पिक विमा द्यावा व सन 2018 2019 चे नुकसानग्रस्त कापूस बोंड आळी उर्वरित 20 टक्के अनुदान तात्काळ मिळावे तसेच ठिबक संच योजनेतील पूर्वीप्रमाणे 7 वर्षाच्या अट कायम करण्यात येऊन आत्ताची 10 वर्षाची अट रद्द करावे नानाजी देशमुख कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत होणाऱ्या योजनेसाठी पारोळा कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण असून त्यात लवकरच वाढ करण्यात यावी असे आशयाचे निवेदन कृषिमंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आले यावेळी शेतकरी संघटना पारोळ्याचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष दत्तू पाटील अध्यक्ष विनोद पाटील मोहन पाटील प्रल्हाद पाटील निंबा पाटील मधुकर पाटील रवींद्र पाटील दगडू पाटील अनिल वाघ राजू पाटील नितीन पाटील शेतकरी उपस्थित होते