Sunday, May 29, 2022

शेतकरी कुटुंबातील सून असल्यानेच उमेदवारीː महापौर जयश्री महाजन (व्हिडीओ)

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

‘जिल्हा बँक’ ही प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठी वाहिलेली म्हणून गणली जाते. शेतकरी कुटुंबातील सून असल्याने मला शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांची चांगल्याप्रकारे जाण आहे. त्यामुळे जिल्हा बँकेशी निगडीत शेतकर्‍यांचे प्रश्न तत्काळ सुटावेत व त्यांना न्याय मिळावा, यासाठी आज सोमवार, दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी मी उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी प्रतिक्रिया जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

थेट लाईव्ह…..👇

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून, जिल्हा बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आज सोमवार, दि. 18 ऑक्टोबर 2021 शेवटच्या दिवशी दुपारी ‘महाविकास आघाडी’तर्फे जळगाव तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महिला आघाडीच्या जळगाव शहरप्रमुख शोभा चौधरी, उपशहरप्रमुख ज्योती शिवदे, शिवसैनिक  सरिता माळी-कोल्हे, निलूताई इंगळे त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत असून, त्या अनुषंगाने सोमवार, दि.11 ऑक्टोबर 2021 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज सोमवार, दि. 18 ऑक्टोबर 2021 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. बुधवार, दि.20 ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, गुरुवार, दि.21 ऑक्टोबर ते सोमवार, दि.8 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, रविवार, दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष मतदान होऊन सोमवार, दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर केला जाणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या