शेतकरी आंदोलनास चाळीसगाव कांग्रेस चा धरणे आंदोलनाने पाठिंबा ; तहसीलदारांना निवेदन

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : भाजपच्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळे कायदे संमत केले. त्या विरोधात संपूर्ण देशभरात मुख्यत: दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभारले आहे या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी ११वाजता चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात व जळगाव जिल्हा कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष अॅड भैय्यासाहेब संदीप पाटील यांच्या आदेशानुसार चाळीसगाव काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन आंदोलन करून शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. या शेतकरी आंदोलनास पाठिंबा बाबतचे निवेदन चाळीसगाव चे तहसीलदार श्री अमोल मोरे यांना देण्यात आले.

या धरणे आंदोलनात चाळीसगाव तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील ,तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष आर डी चौधरी ,शहराध्यक्ष अल्ताफ खान जमशेर खान, माजी आमदार ईश्वर जाधव ,प्रदीप देशमुख, मंगेश अग्रवाल ,लोटन सोनवणे ,नितीन सूर्यवंशी, सुधाकर कुमावत, अॅड संदीप सोनार, बापू चौधरी, नितीन परदेशी ,आर जी पाटील, किसान संघटनेचे अध्यक्ष आर के पाटील, एम एम पाटील, सुनील राजपूत ,आप्पा चौधरी, अनिल वसंतराव पाटील, गयास शेख, पुंडलिक राठोड ,बन्सीलाल दामू राठोड ,पंकज शिरोळे प्राध्यापक गौतम निकम, जगन्नाथ वाणी ,नगरसेवक सुरेश हरदास चौधरी ,राहुल मोरे ,जितेंद्र साहेबराव चौधरी ,कैलास वसंत पाटील, विजय पगारे व्हि डि सूर्यवंशी  आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.