Saturday, December 3, 2022

शेख आरिफ शेख बद्रुद्दिन यांची अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी निवड

- Advertisement -

पहूर ता.जामनेर- पहुर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शेख आरिफ शेख बद्रुद्दिन उर्फ राजू जेंटलमॅन यांची जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्य विभागाचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण यांनी दिले.

- Advertisement -

शेख आरिफ शेख बद्रुद्दिन उर्फ राजू जेंटलमेन यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड व दिगंबर केशव पाटील माजी सरपंच प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, श्याम सावळे, शरद सोनार, भिका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, दलित मित्र मोरसिंग राठोड, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे, माजी उपसरपंच ईका पैलवान, वसीम शेख सलीम शेख, ग्रामपंचायत चांदा तडवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, विजय पांढरे, डॉ.बाजीराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या