शेंदुर्णी, ता. जामनेर (प्रतिनिधी) : येथील नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बाजार परिसरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिकचा साठा उपयोग करणाऱ्या दुकानावर धडक कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत त्यांच्याकडून २२५०० रुपयाचा दंड वासून करण्यात आला असून ३५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
यावेळी शहरातील व्यापारी व नागरिकांनी बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिकचा वापर किंवा साठा करू नये, असे आवाहन नगर पंचायतीच्या वतीने करण्यात आली. नपाने नियमित धडक मोहीम राबवून शहरातील सर्वच भागातील दुकानांची तपासणी करून बंदी असलेले प्लॅस्टिकची साहित्य आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
यांनी केली कार्यवाही
बांधकाम अभियंता भैयासाहेब पाटील, पाणीपुरवठा अभियंता सुहेब काझी, विकास सपकाळ, जगदीश गुजर, कपिल जावळे, विलास जोहरे, दिनेश कुमावत, राजकुमार बारी, पंकज गुजर, इरफान शेख, सागर गुजर, योगेश वाघ, राजेश जावळे, संजय सकट, हरी बारी, उमेश कापरे, ईश्वर सोनवणे, ज्ञानेश्वर फुसे, नंदू निकम, राजू सकट हे कर्मचारी उपस्थित होते.

