शेंदुर्णी येथे २३जून रोजीभव्य रोगनिदान शिबीर

0

शेंदुर्णी :-येथील डॉ.हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ चारूदत्त साने यांच्या स्मरणार्थ साने हॉस्पीटल व डॉ हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ ,गोदावरी वैद्यकीय व सामाजीक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शेंदुर्णीडॉक्टर असोशिएशन यांच्या सहकार्याने दि.२३जून रविवार रोजी सरस्वती विद्या मंदिर, शेंदुर्णी येथे भव्य वैद्यकीय रोगनिदान व उपचार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. शिबिरामध्ये डॉ .विकास रत्नपारखी (मधुमेहतज्ञ , ह्ददयरोग तज्ञ) ,डॉ .कल्पक चारूदत्त साने (मधुमेह तज्ञ) , डॉ.अंजली पाटील (कर्करोग तज्ञ), डॉ .नितीन धांडे (अस्थीरोगतज्ञ ), डॉ . शितल अग्रवाल (नेत्ररोगतज्ञ), डॉ. जितेंद्र नारखेडे (जनरल सर्जन) डॉ. उमेश वानखेडे (अस्थीरोगतज्ञ) डॉक्टर रूग्णाची तपासणी करणार आहे. तरी गरजू रूग्णांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजकामार्फत करण्यात आलेले आहे. रूग्णानी नाव नोंदणीसाठी साने हॉस्पीटल, Q1कॉम्पूटर , श्रद्धा लॅबोटरी येथे नावे नोंदवावी.

Leave A Reply

Your email address will not be published.