Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शेंदुर्णी येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न ….
    जळगाव

    शेंदुर्णी येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न ….

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 12, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    समाज उपयोगी नियोजीत कार्यालयाच्या फलकाचे अनावरण …..

    शेंदुर्णी (ता.जामनेर ) – येथील सुवर्णकार प्रतिष्ठान व महिला सुवर्णकार  प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची ७३४ वी पुण्यतिथी सोहळा येथील संत श्री नरहरी महाराज नगर येथे उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल होते . .

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन व नियोजीत बहुउद्देशीय हॉलच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

    सकाळी कडोजी महाराज मंदिरात संत नरहरी महाराज यांच्या मुर्तिस अभिषेक व पुजाअर्चा करण्यात आली . तसेच दिनेश विसपुते यांच्या घरी सत्यनारायणाची पुजा करण्यात आली . दुपारी ४ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गाने भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील पुरुष , महिला भजनी मंडळ , समाज बंधू भगिनी

    , लहान मुले ,यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता . रात्री ८ वा हभप रविंद्र महाराज (तारखेडकर ) यांचा सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम श्री त्रिविकममंदिरात संपन्न झाला .

    प्रमुख पाहूणे म्हणून शेंदुर्णी नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजया खलसे , अमृत खलसे , माजी जि.प. सदस्य संजय गरूड , मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ . विजयानंद कुलकर्णी ,नगरपंचायतीच्या गटनेत्या रंजना धुमाळ , सर्व नगरसेवक,यांची उपस्थिती होती

    कार्यक्रम प्रसंगी मंगल कार्यालयाच्या नियोजीत जागेच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .आणी भविष्यात या जागी बहुउद्देदेशिय हॉल बांधून तेथे सामाजिक विकासाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प समाज बांधवातर्फे करण्यात आला .

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज अध्यक्ष श्रीपाद विसपुते यांनी केले .तर सुत्रसंचलन संजय विसपुते तर आभार योगेश वडनेरे यांनी मानले .

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी  अथक परिश्रम घेतले .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif