शेंदुर्णी, ता.जामनेर (प्रतिनिधी) : कोरूना वारियर्स हे प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावीत आहे. त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या आरोग्याची काळजी घेत शेंदुर्णी डॉक्टर असोसिएशनने रोग प्रतिकार क्षमता वाढवणारे औषधांचे वितरण केले. ही बाब कौतुकास्पद आहे. असे उद्गार वितरण प्रसंगी गोविंद अग्रवाल यांनी काढले.
सदर योजनेचा शुभारंभ नगर पंचायत येथे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांचे सोबत नगराध्यक्षा पती अमृत खलसे व उपनगराध्यक्षा पती गोविंद अग्रवाल यांनी शंभराहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना औषधाचे वितरण केले. सदर उपक्रमाचे आयोजन शेंदुर्णी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ देवानंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टरांनी केले. आयुष मंत्रालय दिल्ली यांनी सुचवलेले आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधाचे वितरण झाले.
तीनशेहून अधिक बॉटलचे मोफत वितरण
त्यानंतर डॉ असोसिएशनच्या कार्यालयात सर्व पोलिस कर्मचारी ,बँक अधिकारी, पतसंस्था चे कर्मचारी ,कर्मचारी ग्राहक केंद्राचे कर्मचारी, सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी डॉक्टर्स पॅरामेडिकल स्टॉप यांना तीनशेहून अधिक बॉटलचे मोफत वितरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अध्यक्ष देवानंद कुलकर्णी डॉक्टर अजय सुर्वे, डॉ श्रीकांत पाटील , डॉ मंगेश पाटील ,डॉ नीलम कुमार अग्रवाल, डॉ राहुल सूर्यवंशी, डॉ अल्केश नवाल ,डॉ चेतन अग्रवाल, डॉ अतुल पाटील, डॉ संदीप बारी ,डॉ स्वप्नील संगवी ,डॉ संजय राजपूत, डॉ स्वप्नील बारी ,डॉक्टर शुक्ला आदी उपस्थित होते.