शेंदुर्णी :- रामभक्त हनुमान यांचा जन्मसोहळा शेंदुर्णी व परिसरात मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
शहरातील विविध हनुमान मंदिरात विद्युत रोषणाई, फुलांनी सजविण्यात आले होते.भल्या पहाटे हनुमंत रायाचा जन्मसोहळा करण्यात आला.
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील बस स्थानका जवळीक हनुमान मंदिर, वाडी दरवाजा भागातील हनुमान मंदिर, त्रिविक्रम मंदिराच्या समोरच्या हनुमान मंदिर व सोयगांव तालुक्यातील तरंगवाडी येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या ठिकाणी महाप्रसाद, भंडारा आयोजित करण्यात आला. याचा भाविकांनी लाभ घेतला.
रात्री मिरवणुक..
रात्री शहरातुन वाडी दरवाजा भागातील हनुमान मंदिराच्या पासुन सवाद्य भव्य मिरवणुक काढण्यात आली.यात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग होता.