Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»शेंदुर्णीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा
    ताज्या बातम्या

    शेंदुर्णीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा

    By April 2, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    शेंदुर्णी…
    यंदाचे ९९ वे वर्ष असलेल्या संतकवीतिलक वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा होणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदा करोनाच्या पार्श्वभुमीवर अतिशय साध्य पद्धतीने परंपरा जोपासत पोलिस प्रशासन व सरकारने घालुन दिलेल्या अटीनुसार केवळ चारच व्यक्तिंच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात प्रभु रामरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
    यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते पुढच्या वर्षी उत्सवाचे १०० वे वर्ष आहे मात्र करोनाच्या मुळे सर्व धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, जन्माचे कीर्तन, पालखी मिरवणुक व तद्नंतर होणारे भारुडांचे कार्यक्रम सुद्धा ईतिहासात प्रथमच रद्द करण्यात आले.
    प्रथा व परंपरेनुसार श्रीराम मंदिर आतुन झेंडुच्या फुलांनी सुंदर सजविण्यात आले आहे.सकाळी परंपरेने सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यापारी किशोर काबरा यांनी सपत्नीक श्रीरामास अभिषेक व पुजा केली.दुपारी १२ वाजता केवळ ४  जणांच्या उपस्थितीत श्रीराम प्रभुंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभुंचा पाळणा सुंदर, आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.त्यात प्रभुंची मुर्ती ठेवण्यात आली बरोबर १२ वाजता प्रभु रामचंद्र कि जय या जयघोषात रामरायांचा जन्मोत्सव पार पडला.रामाचा पाळणा म्हण्यात आला तद्नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. दरवर्षी यासाठी श्रीराम मंदिरात व प्रांगणात हजारो भाविक या जन्मोत्सवाचे निमित्ताने येत  असतात यंदा मात्र केवळ ४ व्यक्तिंच्या उपस्थितीत हा जन्म सोहळा पार पाडावा लागला.यामुळे अनेक भाविकांना आपले यंदा दर्शन झाले नाही या बद्दल हळहळ लागुन राहिली.
    पालखी व मिरवणुकही रद्द..
    दरवर्षी रात्री शहरातुन निघणारी श्रीं ची भव्य पालखी मिरवणुकही यंदा रद्द करण्यात आली आहे.
    करोनाचे संकट लवकर दुर होऊन सर्वांनाच चांगले आरोग्य व आयुष्य लाभो हिच मनोकामना व प्रार्थना श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांच्या वतीने रामरायाच्या चरणी करण्यात आली असुन नागरिकांनी घरातच बसुन आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif