शेंदुर्णीत लाँकडाऊनला व्यापारी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद

0

शेंदुर्णी ता.जामनेर : करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने काल रात्री पासुन सुरू केलेल्या लाँकडाऊनला आज शेंदुर्णीत नागरिकांनी, व्यापारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेऊन लाँकडाऊनला सहकार्य केले आहे.

सकाळ पासुनच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पहुरचे पोनि. राहुल खताळ, शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोउनि. किरण बर्गे यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत जात नागरिकांना, व्यापारी यांनी मास्क लावावे, करोनाची चाचणी करून घ्यावी, केली असेल तर त्याचे प्रमाणात जवळ बाळगावे,सोशल डिस्टिंशन चे पालन करुन सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

अत्यावश्यक सेवा, किराणा दुकान वगळता सर्व बाजारपेठ बंद होती.गांधी चौकात व सार्वजनिक वाचनालय येथे होणारी गर्दी आज दिसली नाही. नागरिकांनी करोनाला हरविण्यासाठी शासन,प्रशासन, नगरपंचायतीने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर निघावे  आपल्या गावाचे ,आपल्या परिवाराचे ,आपले आरोग्य करोनामुक्त होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ.विजया खलसे ,मुख्याधिकारी साजिद पिंजारी पोलीस निरीक्षक राहुल खताळ पोलीस उप निरिक्षक किरण बर्गे, व्यापारी असो.अध्यक्ष तजय अग्रवाल,वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.