शेंदुर्णीत मुख्याधिकारी यांची धडक कारवाई ; लॉकडाऊन उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

0

शेंदुर्णा ता.जामनेर : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लाँकडाऊनचे शहरात दुकानदार दरदिवशी सर्रासपणे उल्लंघन करत असल्याने आज दुपारी अचानक मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे आपल्या सहकाऱ्यांच्या सह बाजारपेठेत दाखल झाले व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली.

करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लाँकडाऊन लावण्यात आले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी काही दुकानदार हे नियम धाब्यावर बसवुन दुकाने उघडीच ठेवतात.

काही दुकानदार तर बाहेरून कुलुप लाऊन अन्य मार्गाने आपली दुकानदारी सुरू ठेवत आहे. प्रशासनाने त्यांना आर्थिक दंडही केला होता. मात्र त्याचा म्हणावा तेवढा फरक जाणवला नाही. सार्वजनिक वाचनालय येथे तर सकाळी प्रचंड गर्दी होत असते यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होत असतो.

आज मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे आपल्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत शहरातील मुख्य बाजारपेठेत दाखल झाले होते नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक यांचेवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.