शेंदुर्णीत पावसाचे थैमान : सोन नदीचे पाणी गावात शिरले

0

शेंदुर्णी, ता. जामनेर (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यापासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शुक्रवारी रात्री रुद्र रुप धारण केले.रात्री दहा वाजेपासुन मुसळधार सुरू झालेला पाऊस सकाळ पर्यंत सुरुच होता.यामुळे सोन नदीला मोठा पुर आला आहे.शेतातील हाता तोंडाशी आलेले पिक या अवकाळी पावसाने पुर्ण हिरावुन घेतले आहे.पुराचे पाणी एवढे होते कि बस स्थानक व सार्वजनिक वाचनालय येथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यातुन जावे लागले.

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा..

या अवकाळी पावसामुळे शेतातील कपाशी, ज्वारी, मका हि हाती आलेली पिके डोळ्यासमोर पाण्यात गेली आहे.शेतकऱ्यांना एवढी मेहनत ,मशागत व पैसे खर्च करुन दिवाळीत एक कपाशीचे बोंडही घरी आणता आले नाही. ज्वारी काळी पडली,मका ओला होवुन त्याला कोंब फुटले आहे.कपाशीच्या झाडावर कैऱ्या आहे मात्र झाडांची अवस्था बघवत नाही. यंदा एवढा चांगला हंगाम होणार होता मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर पाणी फिरले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करावा…

सर्वच शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असुन त्वरित पंचनामे व्हायला हवे.सरसकट मदत मिळाली ,कागदपत्रे जमा करण्यात शेतकरी त्रासल आहे .तेव्हा सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळवी यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.