शेंदुर्णीत जनतेचा बंदला १००℅ प्रतिसाद

0

शेंदुर्णी | प्रतिनिधी देवेंद्र पराळकर
आज रविवार दि.२२ मार्च रोजी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला व शासनाच्या आदेशानुसार शेंदुर्णीत नागरिक, व्यापारी यांनी जनता कफर्यु ला चांगला प्रतिसाद दिला असुन अत्यावश्यक सेवा असणाऱ्या ठिकाणांवर सुद्धा तुरळक व्यक्ती दिसत नाही.
सकाळ पासुनच याचा परिणाम दिसायला लागला. दररोज सकाळी प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णीत देव दर्शनासाठी भाविक मंदिरात येत असतात आज मात्र दर्शनासाठी सुद्धा भाविक सकाळी लवकरच येऊन गेले.शहरात नगरपंचायतीच्या वतीने, प्राथमिक आरोग्य केंद्र ,संजयदादा गरुड व शेंदुर्णी शिक्षण संस्था,व्यापारी संघटना, डॉक्टर, मेडिकल असोसिएशन,पत्रकार संघटना, पोलिस प्रशासन ,महसुल विभाग आदींनी करोना यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपल्या परिने जनजागृती केली आहे.
पी.जे.रेल्वे बंद….
पाचोरा-जामनेर या मार्गावर धावणारी गरिबांची जिवण वाहिनी असणारी पाचोरा जामनेर पी.जे.नँरोगेज रेल्वे सुद्धा बऱ्याच वर्षानंतर बंद आहे.एस.टी.बस,खाजगी बस ,ट्रँव्हल्स,रिक्षा आदी पुर्णपणे बंद आहे.शेंदुर्णीत आज संचारबंदी सारखे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.