शेंदुर्णी :- सध्या उन्हाची तीव्रता भेडसावत असुन शेंदुर्णी हे जामनेर तालुक्यातील मोठे शहर आहे.४० हजार लोकवस्ती आहे.या गावातही तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे .यासाठी नगरपंचायतीच्या स्तरावर पुर्ण प्रयत्न होत असुन यासाठी नगरपंचायतीच्या हद्दीत टंचाई विभागातुन बोअरवेल घेणे व चारा छावणी सुरु करण्यासाची विनवणी शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा सौ.विजया खलसे यांनी जिल्हा प्रशासन ,जिल्हाधिकारी जळगांव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
यंदा दुष्काळी परिस्थिती असुन नदी नाले कोरडे पडले असुन विहिरी, आड यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असुन शेंदुर्णीस पाणी पुरवठा करणाऱ्या गलवाडा जि.औरंगाबाद येथील धरणातुन पाणी पुरवठा होतो आहे.८ दिवसांनी पाणी पुरवठा होतो .गोंदेगांव धरण कोरडे आहे.पाण्याच्या टंचाई अधिक तीव्र होईल तेव्हा शेंदुर्णी नगरपंचायतीच्या हद्दीत तातडीने टंचाई विभागातुन ३५ ते ४० बोअरवेल घेण्यासाठी विनंती केली आहे.
चारा छावणी..
या उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाई मुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही फार मोठी टंचाई चिंतेत टाकत आहे.या सोबतच गुरांच्या चाऱ्याचीही मोठी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.पिण्याच्या पाण्याच्या सोबतच मुक्या जनावरांच्या पाणी व चारा यामुळे उन्हाची दाहकता अधिक जाणवत आहे. यासाठी शेंदुर्णीत चारा छावणी सुरू होणे फारच आवश्यक आहे यासाठी नगरपंचायत मालकीचे शेतही उपलब्ध करुन देणार आहे.
तेव्हा बोअरवेल तातडीने घेण्याबाबत संबंधितांना आदेश व्हावेत तसेच चारा छावणी शेंदुर्णीत सुरु व्हावी अशी विनंती शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.विजया खलसे यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांना दिलेल्या पत्रात केली असुन याबाबत राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरिशभाऊ महाजन, जिल्हयाचे पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील व जामनेर तहसीलदार यांनीही पत्रद्वारे विनंती केली आहे