शेंदुर्णी :- शेंदुर्णीत संत गजानन महाराज यांच्या १४१ व्या प्रकट दिनानिमित्ताने दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ फेब्रुवारी शुक्रवार सकाळी ८ वाजता संत गजानन महाराज यांच्या मुर्तीला व पादुका अभिषेक तसेच पुजा ,श्री.संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण रात्री ८ वाजता सोयगांव व शेंदुर्णी येथील महिला मंडळ यांचे संगीत भजन होईल.
दि.२३ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी ८ वाजता श्री. संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण रात्री ८ वाजता, ह.भ.प.माऊली महाराज , सातगांव डोंगरी यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. दि.२४ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता श्री. संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण समाप्ती होईल तसेच रात्री ८ वाजता ह.भ.प.कडोबा महाराज माळी यांचे जाहीर कीर्तन होईल.
दि.२५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ८ वाजता श्री. संत गजानन महाराज प्रगट दिनाच्यानिमित्ताने प्रतिमा व पादुकांची सवाद्य पालखी सोहळा संध्याकाळी ६ वाजता महाआरती व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संत गजानन महाराज यांना ५६ भोगाचा नैवद्य गजानन भक्त महिला मंडळाच्या वतीने दाखविण्यात येणार आहे. वरील सर्व कार्यक्रम संत गजानन महाराज भक्त मंडळ शेंदुर्णीच्या वतीने संत गजानन महाराज चौक, ब्राह्मण गल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.