शेंदुर्णीत कै. डॉ चारुदत्त साने यांचा पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

0

भव्य रोगनिदान व उपचार शिबिर.. ५०० रूग्णाची मोफत तपासणी ; CBSC शाळेचे उद्घाटन ; इ.10 वी,12 वी मधील गुणवंतांचा सत्कार.
शेंदूर्णी | प्रतिनिधी
डॉ हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै .डॉ . चारुदत्त साने यांचा वा पुण्यस्मरण दिन सरस्वती विद्या मंदिर व श्रीकृष्ण माध्य व उच्च माध्यमिक विदयालय विदयालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला .यावेळी संस्थेच्या लिटिल चॉम्स् किंडर गार्टन या शाळेचे शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल हे होते . प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जेष्ठ नेते उत्तमदादा थोरात , संस्थाध्यक्षा डॉ. कौमूदी साने , अमृतबापू खलसे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व मान्यवरांनी कै .डॉ . चारूदत्त साने यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्ज्वल केले .साने हॉस्पीटल व डॉ . हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ व गोदावरी वैदयकिय व सामाजिक प्रतिष्ठान , शेंदुर्णी डॉक्टर असोशििएशन यांच्या सहाय्याने वैदयकिय रोगनिदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . शिबिरामध्ये डॉ . विकास रत्नपारखी ( मधूमेह व हदयरोग तज्ञ) , डॉ . अंजली पाटील (कर्करोग तज्ञ )डॉ . नितिन धांडे (अस्थिरोग तज्ञ )डॉ जितेंद्र नारखेडे (जनरल सर्जन) डॉ कल्पक साने (मधूमेह तज्ञ )डॉ . उमेश वानखेडे ( अस्थिरोग तज्ञ) , डॉ योगेश भोगावकर , डॉ इम्रान पटेल डॉ नजमा पटेल या तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मोफत औषधी वितरीत करण्यात आली . यावेळी रुग्णांची महागडया चाचण्या ECG, Hba1C ह्या मोफत करण्यात आली . यावेळी 500 रुग्णांनी तपासणी केली .
कार्यक्रमामध्ये इ 10 वी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विदयार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला . गुणवंत विदयार्थ्यांमध्ये सानिका महाजन , दिपिका चौधरी मानसी पाटील अंकिता पाटीला प्राजक्ता पवार अजय उसरे विवेक मराठे सौरभ पाटील रेणुका परदेशी या विदयार्थ्याचा पालकांसह संस्थेतर्फे व संचालिका सौ कल्याणी कुळकर्णी यांकडून रोख बक्षिसे , सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच मुंबई येथील ऋषीकेश कौस्तुभ महाजन याला इ.१०वी बोर्ड परीक्षेत ८९ % गुण मिळाल्याबदद्ल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमात डॉ .विकास रत्नपारखी, डॉ .अंजली पाटील , संचालिका कल्याणी ताई कुळकर्णी , उत्तमदादा थोरात आणि संस्थाध्यक्षा डॉ . कौमूदी साने यांनी मनोगत व्यक्त केले . अध्यक्षिय भाषण श्री गोविंद अग्रवाल यांनी केले .
या कार्यक्रमात संस्थेचे सचिव कांतिलाल ललवाणी , संचालक डॉ .कल्पक साने, .ऋचा साने, अमृत खलसे , नगरसेवक सतिष बारी निलेश थोरात , शरद बारी , श्रीकृष्ण चौधरी , अशोक औटे , सुधाकर गुजर, श्रीकांत काबरा ,कडोबा सुर्यवंशी , उदय पालखे . शुभदा पालखे , .रमा साने ..पल्लवी महाजन , उज्ज्वला बर्वे , उदय बर्वे , कौस्तुभ महाजन,अमेय पाटसकर , डॉ सुनिल बोरसे , डॉ . नजिर पठाण , आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.